Virat Kohli ने मारली Century ची Half Century | Virat Kohli Latest Update

2021-09-13 2

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील या शकतासह विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने कसोटीत 18 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 32 शतके झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात षटकाराच्या मदतीनं विराटने शतक पूर्ण केले. या सामन्यात विराटने 119 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 104 धावांची खेळी कली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक वन-डे शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला होता. रिकी पाँटिंगचा 30 शतकांचा विक्रम कोहलीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मोडला होता.विराटने आपल्या 200 व्या आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला होता. वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहलीच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews